डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केरळ राज्याचं नाव ‘केरळम्’ करण्याच्या प्रस्तावाला संमती

केरळ राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत आज एकमताने संमत झाला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्रसरकारकडे पाठवण्यात येईल. यापूर्वी गेल्या ऑगस्टमधे असा प्रस्ताव केरळ विधानसभेने संमत केला होता मात्र काही त्रुटी राहिल्यामुळे तो बारगळला होता. त्यामुळं हा नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.