महाराष्ट्र शासनाच्या “प्रोजेक्ट सुविता” अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. याशिवाय ४० लाख गर्भवती महिलांचा सहभाग या उपक्रमात नोंदवला गेला आहे. अशा प्रकारे एकूण ९४ लाख लाभार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे. या कार्यक्रमांतर्गत बालकांचं वेळेवर लसीकरण आणि गर्भवती महिलांसाठी मातृ आरोग्य सेवा वाढवण्यासाठी वेळेवर एसएमएस संदेश पाठवले जातात. प्रत्येक संदेशात लसीचं नाव, त्या लसीनं कोणत्या आजारांपासून संरक्षण होतं याची माहिती, आणि जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क करण्याचं आवाहन, यांचा समावेश असतो.
Site Admin | November 21, 2025 6:51 PM | Project SUVITA
‘प्रोजेक्ट सुविता’ अंतर्गत ५० लाखांहून अधिक बालकांच्या पालकांची नोंद