प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत भारतातील चित्त्यांची संख्या वाढविण्यासाठी बोत्स्वाना आज आठ चित्ते भारताला हस्तांतरित करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बोत्सवानाचे राष्ट्रपती डुमा बोको यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत काल ही घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांमधे वन्यजीव संवर्धनात द्विपक्षीय सहकार्याचा एक नवीन अध्याय यातून सुरु होत आहे.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रपतींच्या द्विपक्षीय चर्चेनंतर, आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. भारत बोत्सवानाला एचआयव्ही उपचारांसाठी एआरव्ही औषधं पुरवणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं बोत्सवानाच्या संसदेत भाषण झालं. तिथल्या भारतीय समुदायाशी त्या आज संवाद साधणार आहेत त्यानंतर त्या मायदेशी परत येतील.