प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांनी महर्षी दयानंद महाविद्यालय इथं वीस वर्षांहून अधिक काळ मराठी विषयाचं अध्यापन केलं. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून अठरा वर्ष अध्यापन करत होत्या. त्यांनी कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र, समीक्षा इत्यादी प्रकारांत विपुल लेखन केलं. ‘अधोरेखित’, ‘अभोगी’, ‘पाडिले वळण’, ‘बीजमंत्र’ हे कथासंग्रह, ‘किन्नर’, ‘टीझर’ या कादंबऱ्या तर ‘तनुभाव’, ‘सप्तक’, ‘सारस्वताचे हुंकार’ या ललित गद्यसंग्रहांचं त्यांनी लेखन केलं आहे. रखमाबाई: एक आर्त हे त्यांचं विशेष गाजलेले पुस्तक आहे.
Site Admin | August 16, 2025 3:46 PM | डॉ. मोहिनी वर्दे | प्राध्यापिका | लेखिका
प्राध्यापिका, लेखिका डॉ. मोहिनी वर्दे यांचं निधन
