थांबा! प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं होतोय ‘कॅन्सर’

प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढतो असा संशोधन अहवाल ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. potassium sorbate, potassium metabisulfite, sodium nitrite, potassium nitrate, acetic acid यासारख्या अन्नपदार्थांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या रसायनांमुळं कर्करोगाचा धोका वाढतो, असं यात म्हटलंय. फ्रान्समधल्या पॅरिस सीटे विद्यापीठातल्या संशोधकांनी १ लाख ५ हजार कर्करोगमुक्त नागरिकांचा अभ्यास केला. त्यातल्या ४ हजार २०० लोकांना या काळात कर्करोगाचं निदान झालं.