डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 13, 2024 10:16 AM | HSC | SSC

printer

दहावी आणि बारावी परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा काल मंडळानं जाहीर केल्या. दर वर्षीच्या तुलनेत 2025 च्या परीक्षा आठ ते दहा दिवस लवकर घेण्यात येणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च; तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्याचं नियोजन आहे. या तारखांबाबत काही हरकती किंवा सूचना असतील, तर त्या येत्या 23 ऑगस्टपर्यंत कळवाव्यात, असं मंडळाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.