प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचत असल्याचा आनंद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रो गोविंदा लीग स्पर्धेच्या माध्यमातून दहीहंडीचा खेळ जगभरात पोहोचतो आहे, याचा आनंद असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते वरळी इथं बोलत होते. खेळात स्पर्धा असावी, पण ती जीवघेणी असता कामा नये, असं सांगून अपघातमुक्त दहीहंडी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. या खेळाला १०० वर्षांची परंपरा आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ खेळला जातो आणि आता याचा समावेश साहसी खेळांमध्ये करण्यात आला आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं. प्रो गोविंदा लीग स्पर्धेत यंदा ३२ संघांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी १६ संघांनी कालच्या कार्यक्रमात आपलं कौशल्य दाखवलं. ‘सातारा सिंघम’ या संघानं पहिलं बक्षीस पटकावलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.