डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी विजयी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सत्यन मोकेरी यांचा ४ लाख १० हजार ९३१ मतांच्या फरकानं पराभव केला. प्रियांका यांना ६ लाख २२ हजार ३३८, तर मोकेरी यांना १ लाख ११ हजार ४०७ मतं मिळाली. भाजपाच्या नव्या हरिदास तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना १ लाख ९ हजार ९३९ मतं मिळाली. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. भाजपाचे संतुकराव हंबर्डे यांनी काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांच्यावर ४६ हजारापेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे.