डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत फेरफार – पृथ्वीराज चव्हाण

राज्यघटनेतल्या तरतुदींनुसार निवडणूक आयोग स्‍वायत्त संस्‍था आहे, मात्र निवडणूक आयुक्‍त निवडण्‍याच्‍या प्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेरफार केले. अप्रत्‍यक्षपणे सरकारच आयुक्तांची नेमणूक करीत असून त्यामुळे आयोग सरकारला अपेक्षितच काम करतो, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. साताऱ्याच्या काँग्रेस भवनमध्‍ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

निवडणूक आयोगाची स्‍वायत्तता धोक्‍यात आली असून, त्‍याची कार्यपध्‍दती आता सरकारी खात्‍याप्रमाणेच झाली आहे असं ते म्हणाले. मतदानासाठी ईव्‍हीएम वापराविरोधात देशव्‍यापी आंदोलन छेडणार असल्याचं सांगून त्याअंतर्गत, सह्यांची मोहम राबवणार असल्‍याचं चव्हाण यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.