डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बातम्यांच्या विश्लेषणासाठी माध्यम देखरेख केंद्राची स्थापना

प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांवरच्या बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी राज्य सरकारने माध्यम देखरेख केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातली अधिसूचना काल जारी झाली. छापील, व्हिडीओ किंवा डिजिटल पद्धतीने प्रसारित झालेल्या बातम्यांचं समीक्षण करून त्यातून दिशाभूल करणाऱ्या आणि तथ्य असलेल्या बातम्यांचं वर्गीकरण करण्यात येईल. या वर्गीकरणाचा अहवाल हे केंद्र तयार करणार आहे. बातमीचा प्रकार निश्चित झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरणही देण्यात येईल. माहिती आणि प्रसिद्धी संचालनालयाच्या माध्यमातून दररोज सकाळी ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत या केंद्राचं काम चालणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा