डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्र्यांच्या आज दोन प्रचारसभा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार विकासात खोडा घालत असल्याचा आरोप गढवा इथल्या सभेत मोदी यांनी केला.

 

विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर झारखंडमध्ये मोदींची ही पहिलीच निवडणूक प्रचार सभा आहे. चाईबासा इथं दुसरी सभा होणार असल्याची माहिती, झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दिली आहे. झारखंडमधे 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.