प्रधानमंत्र्यांचा इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत उत्तराखंडचे लोकसभा खासदार अनिल बलूनी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. यानिमित्तानं मोदींनी समाजमाध्यमावर उत्तराखंडच्या जनतेचं अभिनंदन केलं,तसंच इगासची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी उत्तराखंडमधील लोकांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. देवभूमीचा हा वारसा पुढेही बहरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते.