डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात जळगाव इथं प्रधानमंत्र्यांचा लखपती दिदींशी संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात जळगाव इथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लखपती दीदींशी संवाद साधला. महिला स्वयंसहायता गटांना अडीच हजार कोटी रुपयांच्या सामूहिक गुंतवणूक निधीचं वितरण तसंच ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण यावेळी करण्यात आलं. ३० हजार ठिकाणच्या ११ लाख महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात लखपती दीदी प्रमाणपत्रं देण्यात आली. 

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आदि मान्यवर वाघ  कार्यक्रमाला उपस्थित होते.