प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्याबरोबर १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल माध्यमांना दिली.
चीनमध्ये, प्रधानमंत्री ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभागी होतील.