डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला – नाना पटोले

शेतकरी, कामगार आणि जवानांनी हा देश उभा केला असून देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या प्रगतीचा पाया रचला गेला, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मुंबईत टिळक भवन मुख्यालयात नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसने मोठा संघर्ष केला तसंच नेहरूंनी यासाठी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला याची आठवणही पटोले यांनी करून दिली.