January 24, 2025 1:05 PM

printer

प्रधानमंत्र्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारचे माजी मुख्यमंत्री, भारतरत्न दिवंगत कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली  वाहिली आहे. ठाकूर यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्यायासाठी समर्पित केलं, त्यांचा आदर्श देशातल्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

गृहमंत्री अमित शहा यांनीही कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली  वाहिली आहे. कर्पुरी ठाकूर यांचं जीवन हे समाजातील शोषित आणि मागासवर्गीयांसाठी संघर्ष आणि न्यायाची एक अविस्मरणीय गाथा आहे. कर्पुरी ठाकूर साधेपणा, स्वाभिमान आणि जनसेवेचे उदाहरण आहेत, असं अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.