डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जमैकाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर चर्चा

प्रधान नरेंद्र मोदी आणि जमैकाचे प्रधानमंत्री डॉ अँड्र्यू हॉलनेस यांच्यात आज नवी दिल्ली इथल्या हैदराबाद हाऊसवर अंतराळ, क्रीडा, जागतिक शांतता, चित्रपट निर्मिती आदी विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली. दोनही प्रधानमंत्र्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनात या बाबतीत माहिती दिली. कोविड विरोधी लसींच्या मदतीसाठी हॉलनेस यांनी भारताचे आभार मानले. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी, दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

जमैकाचे प्रधानमंत्री आपल्या चार दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. आपल्या दौऱ्यात ते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींचीही भेट घेणार आहेत. दौऱ्यात इतर मान्यवरांचीही भेट घेतील आणि व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधतील. उद्या ते वाराणसीलाही भेट देणार आहेत. भारत आणि जमैकामधील द्विपक्षीय व्यापार ६ कोटी ६० लाख अमेरिकी डॉलर्सच्या पुढे गेला असून, भारताच्या निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे, असंही हॉलसन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये जाहीर केलेल्या १० लाख अमेरिकन डॉलर्सच्या अनुदानाच्या आधारे जमैकामधील किटसन टाउनमध्ये ग्रामीण विकास प्रकल्प राबवला जात आहे.