डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते वर्धा इथं पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वाटप करतील. या योजनेच्या एक वर्षाच्या यशस्वी पूर्ततेसाठी ते पोस्टाच्या तिकिटाचं अनावरणही करणार आहेत. 

त्यानंतर ते अमरावती इथं पीएम मित्रा अर्थात पीएम मेगा इंटेग्रेटेड टेक्स्टाईल रिजन्स अँड ऍपरल पार्कची पायाभरणी करतील. या एक हजार एकरवर पसरलेल्या पार्कची निर्मिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी सात पीएम मित्रा पार्कला मान्यता दिली आहे. 

प्रधानमंत्री मोदी राज्य सरकारच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन करणार आहेत. १५ ते ४५ वयोगटातल्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातल्या नामांकित महाविद्यालयामध्ये ही केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचंही अनावरण करणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.