प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या डॉकयार्ड इथं नौदलाच्या ३ युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहेत. या ३ युद्धनौका नौदलात सामील होणं हे संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारताचं आणखी एक पाऊल आहे. आयएनएस सुरत ही जगातल्या सर्वात मोठ्या आधुनिक विध्वंसक युद्धनौकांपैकी एक आहे. आयएनएस निलगिरीचं डिझाईन भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं तयार केलं आहे. आयएनएस वाघशीर या पाणबुडीची निर्मिती फ्रान्सच्या नौदलाच्या सहकार्यानं करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रधानमंत्री नवी मुंबईत खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहन मंदिराचं उद्घाटनही करतील.