प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांमधले अडीचशे कारागीर सहभागी होणार आहेत. यात ग्रामीण हाट बाजाराचं आयोजन होणार असून त्यात कारागीर, उद्योजक आणि शेतकरी आपल्या  हस्तकला, हातमाग वस्त्रे, पर्यटन स्थळे तसेच विशेष कृषी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करणार आहेत. यात जी आय टॅग मिळालेल्या ३४ उत्पादनांचा समावेश आहे. यादरम्यान फॅशन शो आणि डिझाईन कॉन्क्लेव्ह च्या द्वारे व्यापाराच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.