प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला करणार संबोधित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत कौटिल्य आर्थिक परिषदेला संबोधित करणार आहेत. आजपासून ६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची ही तिसरी आवृत्ती आहे. हरित कार्यपध्दतीला अर्थसहाय्य, जैव-आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देणं आणि विकासावर होणारे परिणाम, पर्यावरणपूरक बदल टिकवून ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती आणि तत्त्वं कोणती असावीत या विषयांवर परिषदेत भर दिला जाणार आहे. देशपरदेशातील आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि धोरणकर्ते भारतीय अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्थांसमोरील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. कौटिल्य कौटिल्य आर्थिक परिषदेचं आयोजन आर्थिक विकास संस्था ग्रोथ आणि अर्थ मंत्रालय यांनी संयुक्तपणे केलं आहे.