डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा-प्रधानमंत्री

सरकारने आरोग्य सुविधांचं जाळं देशभरात उभं केलं असून सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ५८ कोटी लोकांना आरोग्य विमा पुरवणारी आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना केंद्र सरकार राबवतं असं प्रधानमंत्री म्हणाले. स्वित्झर्लंड मधल्या जिनिव्हा इथं आयोजित जागतिक आरोग्य सभेला ते दूरदृश्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ देशांसमोर आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. भारतात हजारो आरोग्य केंद्र उभारण्यात आली असून यामुळे कर्करोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या रोगांचं निदान लवकर होणं शक्य झालं आहे, औषध विक्री केंद्रातून उच्च दर्जाची औषधं कमी किमतीत उपलब्ध आहेत, तंत्रज्ञानामुळे आरोग्य सुविधांमधे सुधारणा झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.