डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर, द्वीपक्षीय संबंध दृढ करण्यावर चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल संध्याकाळी तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहोचले. श्रीलंकेच्या उच्चस्तरीय मंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आज श्रीलंकेचे पंतप्रधान अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासाठी द्वीपक्षीय चर्चा करतील. भारताच्या शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देण्याच्या धोरणाचा श्रीलंका अविभाज्य भाग असून या भेटीत उर्जा, व्यापार, संपर्कजाळे, डिजीटलायझेशन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये उभय देशांचे संबंध दृढ करण्याच्या हेतूने व्यापक चर्चा करतील. मोदी यांची श्रीलंकेला ही चौथी भेट असून, स्थानिक भारतीय समुदायाकडून त्याचं पारंपरीक पद्धतीने स्वागतही करण्यात आलं. उभय देशांच्या प्रधानामंत्र्यांमध्ये होणाऱ्या चर्चेनंतर विविध क्षेत्रात भारत समर्थित उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त समपूर सौर उर्जा प्रकल्पाच्या पायाभरणी प्रकल्पात दोन्ही देशाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.