डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गुजरातमध्ये ९ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन

 आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी बोलत होते. यावेळी ९ हजार ७०० कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाला शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईतल्या आदिवासींच्या योगदानाविषयी मोदी म्हणाले…

होल्ड… बाईट – नरेंद्र  मोदी

सिकल सेल आजाराचा सामना करण्यासाठी आदिवासी भागांमध्ये आरोग्य केंद्रं, रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली आहेत. हा आजार रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू असल्याचंही  मोदी यांनी सांगितलं.

    या कार्यक्रमापूर्वी सकाळी मोदी यांनी सुरत इथं मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला.  तत्पूर्वी त्यांनी सागबारा तालुक्यातल्या देवमोगरा गावात कुलदेवी पंडोरी मातेच्या मंदिरात प्रार्थना केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.