डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 21, 2024 1:01 PM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसाच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस पोलंड आणि युक्रेन च्या दौऱ्यावर जात आहेत . पोलंडची राजधानी वाॅर्सा  इथं त्यांच स्वागत करण्यात  येणार आहे. पोलंड चे  प्रधानमंत्री  डोनाल्‍ड टस्‍क आणि राष्‍ट्रपती  आंद्रेज डूडा  यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. तसंच पोलंड मधल्या भारतीयांशी  तसच व्यापारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 45 वर्षांनंतर भारताचे प्रधानमंत्री प्रथमच पोलंड भेट देत असून दोन्ही देशाच्या धोरणात्मक द्विपक्षीय संबंधाना यंदा 70 वर्ष पूर्ण होत आहेत. पोलंड आणि भारतातील जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातले ऋणानुबंध जपणाऱ्या दोन स्मृति स्थळांना ही मोदी या दौऱ्यात भेट देणार आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून  प्रधानमंत्री मोदी येत्या शुक्रवारी 23 तारखेला युक्रेनला जाणार असून , 1992 नंतर प्रथमच भारतीय प्रधानमंत्री युक्रेनला  भेट देणार आहेत.  युक्रेनचे प्रधानमंत्री वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या बरोबर ते अनेक द्विपक्षीय मुद्दयांवर चर्चा करणार असून तिथल्या भारतीयांशी आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहे. रशिया युक्रेन दरम्यानच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारतच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.