September 20, 2024 9:58 AM | PM Narendra Modi

printer

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तेथील डेलावेअर इथे होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.