प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट !

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यात कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसळे, सरबज्योत सिंग, कुस्तीपटू अमन सेहरावत यांचा समावेश होता. नीरज चोप्रा उपचारांसाठी जर्मनी इथं गेल्यामुळे तो या भेटीवेळी अनुपस्थित होता.