प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार राज्याच्या दौऱ्यावर असून, ते या दौऱ्यात 5 हजार 9 शे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये विविध नवीन रेल्वे गाड्यांचा शुभारंभ, प्रधानमंत्री घरकुल योजना, नमामी गंगे योजनेअंतर्गत 6 मैला शुद्धीकरण प्रकल्पांच उद्घाटन आदि विकासकामांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आज दुपारी बिहार मधल्या सिवन जिल्ह्यातल्या जसाउली इथं जाहीर सभा घेणार असून त्यानंतर दूरस्थ पद्धतीने त्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन आणि कोनशीला समारंभ होणार आहे. प्रधानमंत्री मोदी आज दुपारी ओडीशा दौऱ्यावरही जात असून भाजपच्या नेतृवाखालील राज्यसरकरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमिताने भुवनेश्वर इथ आयोजित विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते ओडीशा मधील 18 हजार 6 शे कोटीं पेक्षा जास्त खर्चाच्या विकास कामांच उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ होणार आहे