आसाम राज्यामध्ये आज विकासाच्या उत्सवाचा दिवस असून आसामच्या विकासात पुन्हा एकदा एक नवीन अध्याय जोडला जात आहे, तसंच हा केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्येच्या विकासाचा उत्सव आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गुवाहाटी इथल्या गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उदघाटन मोदी यांच्या हस्ते झालं तसंच आसामचे पहिले मुख्यमंत्री बारदोलोई यांच्या ८० फूट उंचीच्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी यावेळी केलं.
Site Admin | December 20, 2025 6:50 PM | Prime Minister Narendra Modi
गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन