डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्लीत ज्ञान भारतम् विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी ते ज्ञान भारतम् पोर्टलचं उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक सहभागाला गती देण्यासाठी ज्ञान भारतम् ह्या डिजिटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. ‘हस्तलिखित वारशाच्या माध्यमातून भारताच्या ज्ञानाचा वारसा पुन्हा मिळवणे’ ही या परिषदेची संकल्पना असून कालपासून ह्या परिषदेची सुरुवात झाली आहे. देशोदेशीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरण तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.