प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं केलं अभिनंदन

लंडनमधील वर्ल्ड टीम ब्लिट्झ अजिंक्यपदस्पर्धेत उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची खेळाडू असलेल्या हौ यिफान हिला पराभूत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखचं अभिनंदन केलं आहे. दिव्याचं हे यश तिच्या धैर्य आणि दृढनिश्चयाला अधोरेखित करतं आणि ते अनेक भावी बुद्धिबळपटूंना देखील प्रेरणा देईल, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.