सर्वांसाठी आरोग्य हा सरकारच्या सबका साथ सबका विकास संकल्पाचा मुख्य आधार-प्रधानमंत्री

‘सर्वांसाठी आरोग्य’ हा सरकारच्या सबका साथ सबका विकास या संकल्पाचा मुख्य आधार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.  मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि संशोधन संस्थेची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली, त्यावेळी ते बोलत होते. गरीब कर्करुग्णांना या संस्थेमार्फत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर्करुग्णांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषणा केल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कर्करोगावरली औषधं कमी किमतीत उपलब्ध केली जातील, पुढल्या तीन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर डे केअर सेंटर उभारले जातील तसंच प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर क्लिनीक उघडली जातील असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. आयुष्मान योजना आणि जनऔषधी केंद्र यासारख्या सरकारी योजनांचा लाभ घ्यायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना केलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.