प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास प्रधानमत्र्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि गोर यांच्यादरम्यान उभय देशांतील द्विपक्षीय संबंध आणि त्याचे जागतिक महत्त्व यांवर चर्चा झाली. गोर यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्याचं जयशंकर यांनी एका समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. तत्पुर्वी, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि गौर यांच्यादरम्यान भारत- अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी यांवर फलदायी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. त्याशिवाय भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशीही गोर यांनी चर्चा केली.