प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देशातल्या सर्वात मोठ्या मुंबई क्रुझ टर्मिनलचं लोकार्पण

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७पर्यंत विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गुजरातमधल्या भावनगरमध्ये समुद्र से समृद्धी तक या कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

यावेळी त्यांनी ३२ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. त्यात मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या उद्घाटनाचाही समावेश आहे. सव्वा ४ लाख वर्गफूट क्षेत्रफळावरं उभं राहिलेलं हे देशातलं सर्वात मोठं क्रुझ टर्मिनल आहे. वर्षाला १० लाखांहून अधिक प्रवासी आणि एकाचवेळी ५ क्रुझ इथं उभ्या राहू शकतात. यावेळी ६६ हजार कोटी रुपयांचे २१ सामंजस्य करार झाले. त्यात महाराष्ट्रात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्याच्या कराराचा समावेश आहे. 

 

प्रधानमंत्र्यांनी अहमदाबादजवळच्या लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाला भेट दिली. कच्छमधे धोरडो हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करीत असून त्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं.