प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या बरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी परस्पर सहकार्यांच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली. दोन्ही देशातल्या समान प्राधान्यांचे विषयही चर्चेत होते. आज सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेंस वाँग यांच्या बरोबर चर्चा केली. दोन्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या चर्चेत परस्पर सहकार्याची नवी वाट निर्माण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग हे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा भारत सिंगापूर यांच्यातल्या संबंधाना ६० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल होत आहे.
Site Admin | September 4, 2025 1:21 PM | Prime Minister Narendra Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या बरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा
