डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील, नामिबियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. घाना हा देश आफ्रिकन देशांच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो, असं मोदी आपल्या प्रस्थानापूर्वी केलेल्या निवेदनात म्हणाले आहेत. भारत आणि घानामधले संबंध दृढ करण्यासाठी तसंच गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा अशा क्षेत्रात सहकार्याचे नवे मार्ग मिळण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही ते म्हणाले. घानाच्या संसदेलाही प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत. या दौऱ्यात घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Companion of the Order of the Star of Ghana प्रधानमंत्री यांना दिला जाईल. या दौऱ्यात घाना इथे वॅक्सीन हब उभारण्याची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

 

या  दौऱ्यात प्रधानमंत्री ब्राझील इथं जाणार असून ते येत्या ६ आणि ७ तारखेला रिओ दी जिनेरो इथं होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.