प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सिक्कीम दौऱ्यादरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी “सिक्कीम@५०: या कार्यक्रमात सहभागी होतील. तसंच राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही करतील. त्यानंतर पश्चिम बंगालमधल्या अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच बिहारमध्ये पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, करकट इथं ४८ हजार ५२० कोटींहून अधिक किमतीच्या आणि कानपूर नगरमध्ये सुमारे २० हजार ९०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी प्रधानमंत्री करणार आहेत.
Site Admin | May 28, 2025 2:33 PM | Prime Minister Narendra Modi
प्रधानमंत्री उद्यापासून सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर
