प्रधानमंत्री आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावरही जाणार असून, अमरावती इथं त्यांच्या हस्ते ५८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची पायाभरणी होणार आहे. देशभरात जागतिक दर्जाची संरचना आणि संपर्क जाळे उभारण्याची वचनपूर्तीचा भाग म्हणून आंध्र प्रदेशातल्या सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. तसंच सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील. या विकास कामांमध्ये विधानभवन, उच्च न्यायालय, सचिवालय आणि इतर प्रशासकीय इमारती तसंच रहिवासी इमारती तसंच एकता मॉल यांचा समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते चौदाशे कोटी रुपये खर्चाच्या क्षेपणास्त्र चाचणीतळाची पायाभरणी करण्यात येणार आहे.