पश्चिम आशियातील घडामोडींसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इस्राईलच्या प्रधानमंत्र्यांशी चर्चा

पश्चिम आशियातील अलीकडच्या काळातील घडामोडींविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी काल चर्चा केली. दहशतवादाला जगात कुठेही थारा नसल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पश्चिम आशियातील तणाव निवळणं आवश्यक आहे; ओलिस ठेवलेल्यांची सुरक्षित सुटका करणंही महत्त्वाचं असून, या क्षेत्रात लवकरात लवकर शांतता आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताचा कायमच पाठिंबा असेल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.