डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन

संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर देशसेवेची जबाबदारी असते, यावर प्रधानमंत्र्यांनी बैठकीत भर दिला. पर्यावरण, पाणी, आणि इतर सामाजिक महत्त्वाच्या लोकहिताच्या विषयात लोकप्रतिनिधींनी अभ्यास करुन ज्ञान संपादन करावं असंही आवाहन त्यांनी केलं. दिल्लीतल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला प्रत्येक खासदाराने किमान एकदा सहकुटुंब भेट द्यावी असंही प्रधानमंत्री म्हणाले. या संग्रहालयात पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांच्यापासून विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्व प्रधानमंत्र्यांविषयीची माहिती उपलब्ध आहे.

सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपद भूषवत असल्याबद्द्ल रालोआ संसदीय पक्षाच्या सर्व सदस्यांनी मोदी यांचा सत्कार केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.