फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांचं सरकार अवघ्या तीन महिन्यात कोसळलं

फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेत अविश्वास ठराव मंजूर झाल्याने प्रधानमंत्री मिशेल बार्नियर यांचं सरकार अवघ्या तीन महिन्यात कोसळलं आहे. सत्ता स्वीकारल्यानंतर अवघ्या ३ महिन्याच्या काळातच बार्नियर यांचं सरकार कोसळलं. सोमवारी त्यांनी संसदेत मतदानाशिवाय वार्षिक अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर संसदेतल्या ५७७ पैकी ३३१ खासदारांनी बार्नियर सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं. बार्नियर यांनी सादर केलेला तंत्रज्ञान आधारित अर्थसंकल्प फ्रान्सची वाढती सुरक्षा आव्हानं आणि गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी असमर्थ असल्याची टीका विरोधी पक्षाचे नेते मरिन ले पेन यांनी केली. बार्नियर यांनी आता राजीनामा देणं अपेक्षित असून त्यांचं मंत्रिमंडळ काळजीवाहू सरकार म्हणून काम करेल. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युल मॅक्रोन आज फ्रेन्च संसदेला संबोधित करणार आहेत.