डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमिळनाडूत विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण

मालदीवचा दोन दिवसांचा यशस्वी दौरा संपवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्री आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचले. ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 

 

मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ‘मुख्य अतिथी’ म्हणून प्रधानमंत्री सहभागी झाले होते. दोन्ही देशांच्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय प्रधानमंत्री मालदीवच्या स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.