डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताला विकसित देश म्हणून उभं करणं हे सर्वांसमोरचं राष्ट्रीय ध्येय-राष्ट्रपती

या शतकाच्या मध्यांतरापर्यंत भारताला विकसित देश म्हणून उभं करणं हे सर्वांसमोरचं राष्ट्रीय ध्येय असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी झालेल्या दोन दिवसीय अभ्यागत परिषदेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. देश विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्थांशी संबंधित सर्व घटक आणि विद्यार्थ्यांनी जागतिक दृष्टिकोन डोक्यात ठेवून पुढे जावं, असं आवाहन मुर्मू यांनी केलं. आंतरराष्ट्रीयीकरणाचे प्रयत्न आणि सहकार्य बळकट केल्याने विद्यार्थ्यांना २१ व्या शतकात स्वतःची अधिक प्रभावी ओळख निर्माण करता येईल, असंही राष्ट्रपतींनी सांगितलं.