राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पोर्तुगाल आणि स्लोव्हाकियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज रात्री उशिरा पोर्तुगालला पोहोचतील. आपल्या पोर्तुगाल दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू पोर्तुलागच्या राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करतील. त्या पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मॉन्टेनेग्रो आणि त्यांच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष जोस पेड्रो अगुइर-ब्रँको यांचीही भेट घेणार आहेत. गेल्या २७ वर्षांमधली भारताच्या राष्ट्रपतींची पहिली पोर्तुगाल भेट असणार आहे. या भेटीमुळे भारताच्या पोर्तुगालसोबतच्या संबंधांना नवी चालना मिळणार आहे.
पोर्तुगालचा दौरा आटोपून स्लोव्हाकियाला पोहोचल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोव्हाकीयाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतील. गेल्या २९ वर्षांमधील भारताच्या राष्ट्रपतींची पहिली पोर्तुगाल भेट असणार आहे. या भेटीमुळे भारताला स्लोव्हाकियासोबतच्या संबंध दृढ करण्यासोबत, त्याचा विस्तार करण्याची संधी मिळणार आहे.