डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. संरक्षणदल  प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल ए.पी. सिंग, आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. दहशतवादाचा मुकाबला करताना सेनादलांनी दाखवलेल्या समर्पण आणि शौर्याचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.