सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या तीन दिवसांच्या दादरा, नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज राष्ट्रपतींच्या हस्ते आज सिल्वासा इथल्या झेंडा चौक शाळेचं उद्घाटन होणार आहे. झेंडा चौक शाळेचं संकुल अत्याधुनिक असून तिथं सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या आधुनिक सोईसुविधा उपलब्ध आहेत.
राष्ट्रपती आज सिल्वासामधल्या नमो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेला भेट देऊन तिथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तसंच त्या दीव इथल्या आयएनएस खुक्री स्मारकाला भेट देतील.