डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७४व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी त्यांच्या कार्यातून देशाची समृद्धी आणि प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा, असं राष्ट्रपती मुर्मू आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाल्या आहेत. तर मोदी यांनी प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळात भारताला विकासाच्या मार्गावर नेलं असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

प्रधानमंत्र्यांनी अथक परिश्रम, चिकाटी आणि दूरदृष्टीने नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत देशाला जगात नवी प्रतिष्ठा मिळवून दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.