डाव्या अतिरेकीवादाने प्रभावित झालेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं असून लवकरच छत्तीसगड हे राज्य नक्षलवादातून मुक्त होईल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला. त्या आज रायपूर इथे छत्तीसगढ विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. ९० सदस्यांच्या या विधानसभेत १९ महिला आमदार असून २०२३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती, याचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं.
Site Admin | March 24, 2025 2:41 PM | Draupadi Murmu
लवकरच छत्तीसगड राज्य नक्षलवादातून मुक्त होईल असा राष्ट्रपतींना विश्वास
