मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना नवी दिल्लीत पोहचले

मोंगोलियाचे अध्यक्ष खुलेरसुख उखना यांचं ४ दिवसांच्या भारतभेटीसाठी आज नवी दिल्लीत आगमन झालं. केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर त्यांना परंपरिक मानवंदना देण्यात आली. या दौऱ्यात उखना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून उद्या ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मोंगोलियाचे अध्यक्ष या नात्याने उखना प्रथमच भारतात आले आहेत.  उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर ते विविध नेत्यांशी चर्चा करतील. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.