भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालाला सपत्नीक भेट देणार आहेत. आग्रा इथल्या विमानतळावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वतीने राज्यमंत्री योगेंद्र उपाध्याय त्यांचं स्वागत करतील. मुईज्जू यांच्या भेटीमुळे ताजमहाल सर्वसामान्यांसाठी दोन तास बंद ठेवला जाईल, अशी माहिती पुरातत्व खात्याच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मुईज्जू आज मुंबई आणि उद्या बेंगळुरूला भेट देतील.
Site Admin | October 8, 2024 2:20 PM | ताजमहाल | मालदीव | राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू आज आग्रा इथं ताजमहालला सपत्नीक भेट देणार
